नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी ? सविस्तर माहिती

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी ? सविस्तर माहिती

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणपणे नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. सध्या काही अफवा पसरत आहेत की ही योजना बंद होणार आहे, पण मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. योजनेचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल.

 

या योजनेच्या मदतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निवडणुकीच्या काळात ही वार्षिक मदत १५ हजार रुपये केली जाईल असे आश्वासन दिले होते, पण आता ही रक्कम वाढणार नसून ती १२ हजार रुपयेच राहणार आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून ६,००० रुपये आणि राज्य सरकारकडून ६,००० रुपये असे विभाजन आहे. या योजनेतील काही निधी ‘कृषी समृद्धी योजने’कडे वळवण्यात आला आहे, जेणेकरून कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक करता येईल. यामुळेच मदतीच्या रकमेत वाढ झाली नाही.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी ?

 

सध्या या हप्त्याच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, हा २,००० रुपयांचा हप्ता बैल पोळा सणाच्या आसपास जमा होण्याची शक्यता आहे. ही केवळ एक शक्यता असून, अधिकृत घोषणा झाल्यावरच निश्चित तारीख कळेल.

 

या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे ९६ लाख शेतकरी पात्र ठरतील. यामध्ये जवळपास ४ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्यांना मागील थकीत हप्ते देखील मिळणार आहेत. या हप्त्यासाठी एकूण १९०० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे.

 

Leave a Comment