आनंदाचा शिधा योजना बंद, आता गनेशोत्सवात मिळनार नाही Anandacha shidha
आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरीवरील वाढलेल्या आर्थिक भारामुळे या योजनेला फटका बसल्याची सांगन्यात येय आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा दिला जानार नाही..
आनंदाचा शिधा योजना बंद, लाडकी बहीण योजनेमुळे
गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, दिवाळी, गुढीपाडवा यांसारख्या सण-उत्सवाप्रसंगी ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जात होता. मात्र आता या योजनेला बंद करण्यात आलंय आणि याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीन योजनेमुळे शासकीय तिजोरीवर आलेला तान आहे..
रेशन दुकानांमधून अवघ्या शंभर रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, हरभराडाळ, तेल व रवा उपलब्ध करून दिला जात होता. राज्यातील कोट्यवधी रेशनकार्डधारकांच्या चेहऱ्यावर योजनेमुळे आनंद निर्माण होत होता. त्यामुळे अल्पावधीत ही योजना जनतेच्या पसंतीस उतरली होती.
सणसुदीचा गोडवा आनंदाच्या शिध्यामुळे वाढीस लागयचा. परंतु ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शासकीय तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय….