कापसाचे भाव कोसळनार, पहा यंदा कापसाला काय भाव मिळू शकतो…
केंद्र सरकारने १८ ऑगस्ट रोजी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३० सप्टेंबरपर्यंतरदर रद्द केले होते. मात्र त्यानंतर लगेचच १० दिवसांनी, २८ ऑगस्ट रोजी, या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसनार आहे.
अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवर आधी २५ टक्के आणि नंतर आणखी २५ टक्के दंड लावून ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावला आहे. अमेरिकेला खुश करण्यासाठी केंद्र सरकारने कापड गिरण्यांची मागणी पुढे केली आणि कापसावरील आयात शुल्क कमी केले. मात्र, याचा अमेरिकेवर कोणताही परिणाम झाला नाही, त्यामुळे कोणत्याही मागणीशिवाय सरकारने या निर्णयाला पुन्हा 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जागतिक बाजारात कापसाचे दर कमी असल्याने कापड गिरण्या गेल्या दोन वर्षांपासून कापसावरील आयात शुल्क हटवण्याची मागणी करत आहेत. आयात शुल्क कमी केल्याने त्यांना परदेशी कापूस स्वस्त मिळतो…
कापसाचे भाव काय परिणाम होनार ?
सध्या भारतीय बाजारात कापसाचा भाव सुमारे ७,५०० रुपये प्रति क्विंटल आहे. जागतिक बाजारातून स्वस्त कापूस आयात झाल्याने देशांतर्गत बाजारात कापसाचे दर ६,५०० ते ७,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतात.
१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या काळात २० लाख गाठी कापसाची आयात होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांना आपला कापूस कमी दरात विकावा लागेल.
शुल्क कमी केल्याने १ ऑक्टोबरनंतर किमान २० लाख गाठी कापसाची आयात वाढेल, असा अंदाज आहे. ११ टक्के शुल्क असतानाही १ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या काळात ३९ लाख गाठी कापसाची आयात झाली आहे….
या निर्णयामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतात, तर कापड गिरण्यांना स्वस्त कापूस उपलब्ध होनार आहे.