तोडकर हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, परतीच्या पावसाचा अंदाज

तोडकर हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस, परतीच्या पावसाचा अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. आता, पुढील दोन दिवस म्हणजे उद्या आणि परवा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज तोडकर यांनी दिलाय…

 

त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीसाठी चांगला वेळ मिळेल. मात्र, त्यानंतर २ सप्टेंबरपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू होईल आणि तो ६ किंवा ७ सप्टेंबरपर्यंत कमी होणार नाही अशी शक्यता आहे. – तोडकर हवामान अंदाज

 

तोडकर हवामान अंदाज ; परतीचा पाऊस कधीपासून ?

 

परतीच्या पावसाची चिन्हे अद्याप दिसत नाहीत,१० ते १५ सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे ऑक्टोबर महिनाही पावसाळी राहण्याची शक्यता आहे अशी माहिती अशोक तोडकर यांनी दिली आहे.

Leave a Comment