नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येनार…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येनार…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक मदत देनारी योजना आसून या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रूपयांचा निधी जमा केला जातो.

नमो शेतकरी चा हप्ता लवकरच येनार खात्यात…

या योजनेचा सातवा हप्ता वितरित होण्यास काही प्रमाणात विलंब झाला आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या हप्त्याचे वितरण अंदाजे २२ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे. शासनाकडून निधी वितरण करण्याचा जीआर (सरकारी निर्णय) जारी झाल्यावर अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी अशी माहिती (प्रभुदेवा gr आणि शेती योजना) चँनलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

 

कोण पात्र कोण अपात्र ?

 

या योजनेसाठी पात्रता निकष सोपे आहेत. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत, तेच नमो महासन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही आपोआपच नमो शेतकरीसाठी पात्र ठरता.

 

नमो शेतकरी लाभार्थी स्टेटस असे ऑनलाइन तपासा

 

तुम्ही तुमचा लाभार्थी स्टेटस ऑनलाइन तपासू शकता. यासाठी नमो शेतकरीच्या पोर्टलवर जाऊन ‘बेनिफिशरी स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करावे. तिथे तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ओटीपीद्वारे तुम्ही तुमच्या पात्रतेची माहिती, तसेच हप्त्याची स्थिती पाहू शकता. तसेच, पीएफएमएस पोर्टलवर जाऊन तुमच्या पेमेंटचा एफटीओ (Fund Transfer Order) स्टेटस देखील तपासता येतो, ज्यामुळे पेमेंटची प्रक्रिया कुठल्या टप्प्यावर आहे हे समजते.

Leave a Comment