निराधार योजना DBT द्वारे पैसे होनार जमा, दोन महिन्याचे एकदाच

निराधार योजना DBT द्वारे पैसे होनार जमा, दोन महिन्याचे एकदाच

 

महाराष्ट्र शासनाने राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या पेन्शन वाटपाला मंजुरी दिली आहे. यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासनाने डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे ६३३ कोटी रुपयांचे वितरण मंजूर केले आहे, ज्यामुळे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जानार आहे.

 

निराधार योजना ; ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिन्याचे एकदाच

 

जुलै आणि ऑगस्ट महिन्याची पेन्शन अद्याप न मिळालेल्या लाभार्थ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. शासनाने सप्टेंबर महिन्याच्या निधीला मंजुरी दिल्याने, ज्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याची पेन्शन जमा झाली नाही, त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांची रक्कम एकत्रितपणे जमा केली जानार आहे. या निर्णयामुळे एकाच वेळी दोन महिन्यांचा लाभ मिळणार आहे.

 

हे पैसे लाभार्थ्यांना लवकर मिळावेत यासाठी शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना वेळेवर मदत मिळनार आहे.

 

हा निर्णय विशेषतः निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे. शासनाचा हा पुढाकार त्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Leave a Comment