पंजाबराव डख हवामान अंदाज ; या तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम, पहा सुर्यदर्शन कधी
पंजाबराव डक यांनी पुढील दोन आठवडे पाऊस कसा राहील, किती दिवस पाऊस आसेल आणि सुर्यदर्शन कधी होईल याबाबत माहिती दिली आहे. या अंदाजानुसार, सध्या 16 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा असेल, विशेषतः मुंबई आणि नाशिक परिसरात 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिमुसळधार पावस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे..
या काळात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस होनार आहे. या पावसामुळे अनेक प्रकल्प आणि धरणं भरतील अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
पंजाबराव डख ; सुर्यदर्शन कधी होनार ?
पोळ्याच्या दिवशी, म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी राज्यात सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होईल आणि 22, 23, 24 आणि 25 ऑगस्ट या चार ते पाच दिवसांसाठी हवामान कोरडे राहील. या काळात शेतकरी त्यांच्या शेतातील महत्त्वाची कामे जसे की फवारणी करणे आणि खत घालणे ही कामे पूर्ण करू शकतात असे डख यांनी सांगितले…
सुर्यदर्शनानंतर पुन्हा पाऊस कधी ?
26 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे पुनरागमन होईल पण जर पुढील काही दिवसांत पावसाच्या प्रमाणात आणि वातावरणात अचानक बदल झाल्यास, त्याविषयी नवीन माहिती दिली जाईल असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख ; आज या जिल्ह्यात मुसळधार..
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार आज १६ ऑगस्ट रोजी नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होनार आहे. १६ ते २० ऑगस्ट दरम्यान परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि कोकणपट्टी या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडेल.
बीड, गेवराई आणि पाथरडी येथे १६ ते २० ऑगस्ट दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र (धुळे, नंदुरबार, जळगाव) या भागात ३० ऑगस्टपर्यंत पावसाची सरासरी ४५० ते ५०० मिमी पर्यंत जाईल…तर पश्चिम महाराष्ट्र (सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे) १६ ते २० ऑगस्ट या काळात चांगला पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.