पुढील 3-4 तासात या जिल्ह्यांत मुसळधारेचा अलर्ट…हे जिल्हे अलर्टवर

पुढील 3-4 तासात या जिल्ह्यांत मुसळधारेचा अलर्ट…हे जिल्हे अलर्टवर

 

राज्यात मागील दोन ते तीन दिवसापासून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. आजही राज्यातील बहुतांश भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

पुढील काही तासांमध्ये राज्यात कोणत्या ठिकाणी कसा पाऊस असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे सविस्तर पाहूया..

पुढील 3-4 तासात या जिल्ह्यांत

 

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
तर बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे…

 

विदर्भातील सर्व जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज (येलो अलर्ट) हवामान खात्याने जारी केला आहे.

 

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

Leave a Comment