मनोज जरांगे news ; आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, आता मुंबईत घुसायचंच
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. बीडमधील एका सभेत त्यांनी सांगितले की, २७ ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीहून मुंबईसाठी निघतील आणि २९ ऑगस्टला मुंबईत पोहोचतील. या आंदोलनात सर्व मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गाने मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे news ; शांततेत आंदोलनाचे आवाहन
जरांगे यांनी आंदोलनात शांतता राखण्यावर भर दिला आहे. त्यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की, आंदोलनादरम्यान कोणीही दगडफेक किंवा जाळपोळ करू नये. जर कोणी असा प्रयत्न करत असेल, तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे. त्यांनी पुढे सांगितले की, हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये. ‘दगडफेक करणारे आपले नाहीत, ते लोक आपल्यात घुसवले जातील,’ असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे ची राजकीय नेत्यांवर टीका
यावेळी मनोज जरांगे यांनी काही राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला ‘बरबाद’ करायचे आहे आणि त्यांना मराठा तरुणांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते. त्याचप्रमाणे, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ‘भुंगारा’ असे म्हणत टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की, या आंदोलनात कोणताही राजकीय नेता सहभागी होणार नाही आणि समाजाची जबाबदारी समाजालाच घ्यावी लागेल.
आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही
जरांगे यांनी ठामपणे सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय ते माघार घेणार नाहीत. ‘थोडेसे आरक्षण राहिले आहे, ते आपण २९ ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनात मिळवणार आहोत,’ असे त्यांनी म्हटले. त्यांनी मराठा बांधवांना गणपती बाप्पा घेऊन मुंबईत येण्याचे आवाहन केले आणि ‘आम्ही आरक्षण घेणारच’ असा निर्धार व्यक्त केला.