मानीकराव खुळे हवामान अंदाज ; पाऊस कमी होणार, दोन दिवसानंतर पुन्हा कमबँक

मानीकराव खुळे हवामान अंदाज ; पाऊस कमी होणार, दोन दिवसानंतर पुन्हा कमबँक

१६ ते २० ऑगस्ट या पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्ट गुरुवारपासून खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाड्यात पाऊस कमी होईल. २२ ऑगस्ट, शुक्रवारपासून तर या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणखी कमी होण्याची शक्यता आसल्याचे मानीकराव खुळे यांनी सांगितले.

 

मानीकराव खुळे हवामान अंदाज ; पुढील आठवड्यात पुन्हा पाऊस…

 

पुढील आठवड्यात २६ ते २८ ऑगस्ट नाशिक, अहमदनगर, जालना, मुंबई, ठाणे, पालघर आणि विदर्भासह खान्देशातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात एम.जे.ओ.च्या प्रवेशामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि ते वायव्य दिशेकडे सरकल्याने हा पाऊस अपेक्षित असल्याचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हनाले.

सध्या सुरू असलेल्या पावसामागे कारणे…

 

१ कमी दाबाचे क्षेत्र ; ओडिसा-छत्तीसगडच्या सीमेवर कमी दाबाचे तीव्र क्षेत्र तयार झाले आहे.

२ मान्सूनचा आस ; मान्सूनचा आस त्याच्या नेहमीच्या जागेपेक्षा दक्षिणेकडे स्थिरावला आहे.

३) चक्री स्थिती आणि वाऱ्यांचा प्रभाव ; अरबी समुद्र आणि गुजरातवर ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्री स्थितीमुळे वारे फिरत आहेत. तसेच, ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर विरुद्ध दिशेने आणि वेगवेगळ्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आहे.

४) द्रोणीय स्थिती ; गुजरात ते केरळ किनारपट्टीदरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाची स्थिती (द्रोण) तयार झाली आहे.

 

या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रात सध्या ‘मघा’ नक्षत्राचा पाऊस पडत आहे. हा पाऊस संथ गतीने आणि गारवा पसरवणारा असतो. या वर्षी ‘मघा’ नक्षत्राला या सर्व वातावरणीय प्रणालींची साथ मिळाल्यामुळे चांगला पाऊस पडत आहे. – (मानिकराव खुळे )

ही माहिती भारतीय हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Leave a Comment