रामचंद्र साबळे ; या आठवड्यात मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस, हे जिल्हे

रामचंद्र साबळे ; या आठवड्यात मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस, हे जिल्हे

 

रामचंद्र साबळे, (कृषी हवामान शास्त्रज्ञ, पुणे) यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील, कुठे मध्यम तर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे,तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या चारही विभागात पाऊस कसा आसेल याबाबत सविस्तर अंदाज दिला आहे.

 

१५ ऑगस्ट, शुक्रवारी हवेचा दाब १००४ ते १००६ हेक्टोपास्कलपर्यंत राहील… शनिवारी १६ ऑगस्ट रोजी हवेचा दाब १००२ ते १००४ हेक्टोपास्कलपर्यंत खाली उतरेल, त्यामुळे 16 आँगष्टपापुन पावसाचे प्रमाण वाढेल असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

 

रामचंद्र साबळे ; कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस..

 

उत्तर महाराष्ट्रात, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये ५ ते १२ मि.मी. हलका पाऊस पडेल. तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये २ ते ६ मि.मी. खुपच हलका पाऊस पडेल…

 

मराठवाड्यात, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये १० ते २५ मि.मी. हलका ते मध्यम पाऊस पडेल. नांदेड जिल्ह्यांमध्ये ८ ते ४० मि.मी. पाऊस पडेल. तर हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ५ ते १५ मि.मी. हलका पाऊस पडेल….

 

विदर्भात, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यांमध्ये ४५ ते ९० मि.मी. पाऊस पडेल. यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांमध्ये ४२ ते ९० मि.मी. (मुसळधार) पाऊस पडेल. तर पूर्व विदर्भात, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्येही ४५ ते ८० मि.मी. आणि चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ७५ ते १३० मि.मी. (मुसळधार ते अतीमुसळधार) पाऊस पडेल.

 

पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये ३ ते ३० मि.मी. (हलका ते मध्यम) पाऊस पडेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये ९ ते ३५ मि.मी. पाऊस पडेल. पुणे जिल्ह्यामध्ये १० ते २० मि.मी. (हलका ते मध्यम) पाऊस पडेल. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये १० ते १३ मि.मी. पाऊस पडेल.

 

या आठवड्यात विदर्भात जोरदार पाऊस पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पाणी काढून टाकावे. राहूरी, बीड, जळगाव, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी विचारले आहे की त्यांच्या भागात चांगला पाऊस कधी पडेल, तर गेल्या ३० वर्षांच्या अभ्यासानुसार, या दुष्काळग्रस्त भागांत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ९ ते १० वेळा जोरदार पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले..

रामचंद्र साबळे यांचा सविस्तर अंदाज – येथे पहा

Leave a Comment