रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात अतीव्रुष्टीचा धोका, पहा या आठवड्यात पाऊस कसा…

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात अतीव्रुष्टीचा धोका, पहा या आठवड्यात पाऊस कसा…

 

27 ते 30 ऑगस्ट या चार दिवसांत, महाराष्ट्राच्या उत्तर भागात 1004 हॅपास्कल कमी हवेचा दाब राहील, तर दक्षिणेकडील भागात 1006 हॅपास्कल हवेचा दाब राहील.

 

हवेचे दाब कमी झाल्यामुळे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या आठवड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे..

 

कोकणातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज साबळे यांनी दिलाय…

 

विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल.. डाँ.साबळे

 

रामचंद्र साबळे जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (मि.मी. मध्ये)

 

कोकण:

सिंधुदुर्ग: 30-40 मि.मी.
रत्नागिरी: 25-38 मि.मी.
रायगड: 35-50 मि.मी
ठाणे: 20-35 मि.मी.
पालघर: 20-30 मि.मी.

 

उत्तर महाराष्ट्र:

नाशिक: 7-15 मि.मी.
धुळे: 10-20 मि.मी.
नंदुरबार: 10-24 मि.मी. आणि काही इतर भागात 15-25 मि.मी.
जळगाव: 11-30 मि.मी.

 

मराठवाडा (हलका ते मध्यम पाऊस):

धाराशीव: 4-15 मि.मी.
लातूर: 7-16 मि.मी.
नांदेड: 15-35 मि.मी.
बीड: 5-20 मि.मी.
परभणी: 11-20 मि.मी.
हिंगोली: 12-18 मि.मी.
जालना: 8-35 मि.मी.
छत्रपती संभाजीनगर: 8-24 मि.मी.

 

पश्चिम विदर्भ: बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत 10-20 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे.

मध्य विदर्भ: यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत 15-75 मि.मी. हलका ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

पूर्व विदर्भ: चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत हलका पाऊस अपेक्षित आहे असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय…

Leave a Comment