हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा, कधी उघडनार & पुन्हा कधी.
हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी २० ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या चार दिवसांसाठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला सांगितला आहे.
हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा, कधी उघडनार & पुन्हा कधी.
२० ऑगस्ट, बुधवार: महाराष्ट्रात १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम, मध्य, पूर्व विदर्भ आणि पुणे जिल्ह्यांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
२१ ऑगस्ट, गुरुवार : पश्चिम महाराष्ट्रात १००० हेप्टापास्कल तर उर्वरित महाराष्ट्रात १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. कोकण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
२२ ऑगस्ट, शुक्रवार: महाराष्ट्रात १००२ ते १००४ हेप्टापास्कल हवेचा दाब राहिल्याने पावसाचे प्रमाण कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे .
२३ ऑगस्ट, शनिवार : महाराष्ट्रात १००४ ते १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. यामुळे कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर उर्वरित महाराष्ट्रात पावसातून उघडीप घेऊन हलक्या पावसाची शक्यता आहे.
हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; जिल्हावार पावसाचा अंदाज (मि.मी. मध्ये)
कोकण:
सिंधुदुर्ग: २३ ते ७० मि.मी.
रत्नागिरी: ३० ते ८५ मि.मी. ्
रायगड: २५ ते १२५ मि.मी
ठाणे: २५ ते १३० मि.मी.
पालघर: २० ते १५० मि.मी.
उत्तर महाराष्ट्र:
नाशिक, धुळे, नंदुरबार: १० ते ४५ मि.मी.
जळगाव: ६ ते २० मि.मी.
मराठवाडा:
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर: ४ ते २० मि.मी.
पश्चिम विदर्भ:
बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती: आज ७० मि.मी. उद्या ७२ मि.मी. शुक्रवार व शनिवारी ४ ते १० मि.मी.
मध्य विदर्भ:
यवतमाळ, वर्धा, नागपूर: आज ६६ ते १२४ मि.मी.उद्यापासून ८ ते १३ मि.मी.
पूर्व विदर्भ:
चंद्रपूर, गडचिरोली: आज व उद्या ७० ते २०० मि.मी. शुक्रवार व शनिवारी १२ मि.मी.
भंडारा, गोंदिया: आज ७० ते ११५ मि.मी.उद्यापासून १२ मि.मी.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र:
कोल्हापूर, सातारा: १० ते ४१ मि.मी.
पुणे: ६५ मि.मी. (मुसळधार)
सांगली, सोलापूर, अहमदनगर: ४ ते २३ मि.मी.