हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; यंदा मॉन्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत
मंगळवारी २६ आँगष्ट ला हवेचे दाब १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके होताच, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण होईल.
बुधवारी २७ आँगष्ट लि पुन्हा १००४ ते १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब होताच, पावसात उघडीप व तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. मात्र गुरुवारी २८ आँगष्ट ला हवेचे दाब १००६ ते १००८ हेप्टापास्कलपर्यंत पुन्हा वाढतील. त्यामुळे बराच काळ पावसात उघडीप राहील.
शुक्रवारी व शनिवारी (२९ व ३० आँगष्ट) उत्तरेस १००४ हप्टापास्कल, मध्यावर १००६ हेप्टापास्कल व दक्षिणेस १००८ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच बराच काळ उपडीप, तर क्वचित वेळा अल्प पावसाची शक्यता निर्माण होईल.अशा प्रकारे या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
या आठवख्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैरत्येकडून राहील. रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २९ कि.मी. राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यामुळे शेतात वापसा येण्यास मदत होईल. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता चांगली राहील. – रामचंद्र साबळे
हवामान अंदाज रामचंद्र साबळे ; यंदा मॉन्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरूजवळ पाण्याच्या पृहभागाचे तापमान १५ अंश सेल्सिअस, तर इक्वैडोरजवळ ते २१ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे तेथील हवेचे दाब वाढतील व हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे यंदा मॉन्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील काळात महाराष्ट्रासह भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील अशी माहिती साबळे यांनी दिली..
रामचंद्र साबळे अंदाज ; थोडक्यात…
प्रमाण कमी असेल आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मंगळवारी (26 ऑगस्ट) मात्र हवामानातील बदलामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर, आठवड्याच्या शेवटी पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होईल.
या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून असेल, ज्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. यामुळे शेतांमध्ये ‘वापसा’ येण्यास मदत होईल.
या वर्षी मान्सूनचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.- पहा सविस्तर
तोडकर हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार
तोडकर हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात जोरदार, 4 ते 5 दिवस या जिल्ह्यात धुमाकूळ
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज सुरू, पहा कुठे आणि कसा करायचा अर्ज