Return Rain यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता
रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार यावर्षीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे… त्यामुळे शेतीपीकांच्या काढनी काळात पिकांचे नुकसान होन्याचा धोका नाकारता येत नाही…
ला-निनाचा प्रभाव वाढतोय
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पेरू (15℃) आणि इक्वेडोरजवळ (17℃) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाल्याने ‘ला-निना’चा प्रभाव वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे असे रामचंद्र साबळे यांनी अंदाजात सांगितले.
22 आँगष्टपापुन पाऊस कमी होनार..
२२ ऑगस्ट रोजी हवेचा दाब पुन्हा वाढून १००२ ते १००४ हेप्टापास्कल होईल, त्यामुळे राज्यात जोरदार बरसत असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल…याचाच अर्थ कि पाऊस फक्त कमी होनार आहे पुर्णपणे बंद होनार नाही…
पावसाच्या स्थितीवर हवामान बदलाचा परिणाम
यंदा १ जूनपासून आतापर्यंतचा विचार केला, तर काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. हवामानातील बदलांमुळे काही भागांत अतिवृष्टी आणि ढगफुटी, तर काही ठिकाणी कमी पाऊस, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे असे साबळे म्हनाले.