UPI App वापरायला फुकट मग त्या पैसे कसे कमवतात..Google Pay and PhonePe income
UPI App ; फोनपे (PhonePe) आणि गुगल पे (Google Pay) यांसारखी यूपीआय (UPI) ॲप्स कोणतेही शुल्क न आकारता दरवर्षी हजारो कोटी रुपये कसे कमावतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खालील काही गोष्टींमधून त्यांना उत्पन्न मिळते…
UPI App वापरायला फुकट मग त्या पैसे कसे कमवतात
व्हॉईस पेमेंट स्पीकर: दुकानदारांकडे असलेले ‘पेमेंट यशस्वी झाले’ असे सांगणारे स्पीकर हे उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे. हे स्पीकर प्रत्येक दुकानदाराला महिन्याला ठराविक दराने भाड्याने दिले जातात. फोनपेने ३० लाखांहून अधिक दुकानांमध्ये हे स्पीकर बसवले आहेत, ज्यामुळे त्यांना दरमहा ३० कोटी रुपयांहून अधिक कमाई होते.
स्क्रॅच कार्ड्स आणि जाहिराती: जेव्हा तुम्ही पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला स्क्रॅच कार्ड मिळते. यामध्ये तुम्हाला रोख रक्कम किंवा इतर काही बक्षीस मिळते. पण हे केवळ तुमच्यासाठी नाही, तर विविध कंपन्यांसाठी एक जाहिरात माध्यम आहे. कंपन्या त्यांच्या जाहिराती या कार्ड्सवर दाखवण्यासाठी गुगल पे आणि फोनपेला पैसे देतात.
बिल पेमेंट आणि रिचार्ज कमिशन: या ॲप्सद्वारे जेव्हा तुम्ही मोबाईल रिचार्ज, वीज बिल, पाणी बिल, किंवा इतर कोणतेही बिल भरता, तेव्हा त्यांना संबंधित कंपनीकडून कमिशन मिळते.
इतर जाहिराती: या ॲप्सवर गुगल किंवा इतर कंपन्यांच्या जाहिराती दाखवूनही ते मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात.
या सर्व मार्गांनी शुल्क न आकारताही फोनपे आणि गुगल पे हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवतात.