Ladki bahin yojana ; या महिलांचे हप्ते वसूली आणि कायदेशीर कारवाई होनार

Ladki bahin yojana ; या महिलांचे हप्ते वसूली आणि कायदेशीर कारवाई होनार

 

Ladki bahin yojana ; राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांची तपासणी केली जात असताना, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

 

अलीकडेच असे उघड झाले आहे की, राज्यातील तब्बल २६ लाख महिलांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. यातच आता आणखी एक नवीन बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १,१८३ जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे.

 

Ladki bahin yojana ; नियमांचे उल्लंघन आणि कारवाईचे आदेश

लाडकी बहीण योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र, या नियमाचे उल्लंघन करून, अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागाने अशा २६ लाख महिलांची यादी तयार केली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू झाली आहे.

 

या यादीत जिल्हा परिषदेच्या १,१८३ महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यावर महिला व बालविकास विभागाने शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) या बोगस लाभार्थ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

 

लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या १,१८३ जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाईदेखील होणार आहे.

 

त्याचप्रमाणे, ज्या महिलांचे हप्ते सध्या चौकशीमुळे थांबले आहेत, त्यांची योग्य चौकशी होईल. चौकशीनंतर त्या योजनेसाठी पात्र ठरल्यास, त्यांचे थांबलेले हप्ते पुन्हा सुरू केले जातील आणि त्यांना पुढील लाभ नियमितपणे मिळेल.

Leave a Comment