Havaman andaj today ; आज या जिल्ह्यात मुसळधार, राज्यात एवढे दिवस पावसाची विश्रांती…
महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार, तर काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला, ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, पुढील ४ ते ५ दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Havaman andaj today ; आज कुठे पाऊस ?
आज कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस तळ, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. दुसरीकडे, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे. (तुरळक ठिकाणी पाऊस) यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुढील 4-5 दिवसांसाठी हवामान विभागाने दिलेला अंदाज महत्त्वाचा आहे. विदर्भ आणि कोकण वगळता इतर ठिकाणी हवामान कोरडे राहील, तर या दोन भागांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची शक्यता नाही.
एकंदरीत, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर आता पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांनी पुढील हवामानाचा अंदाज घेऊन शेतीची कामे करावीत, असा सल्ला दिला जात आहे.




