पि.एम किसान 18000 नमो शेतकरी 12000 एकदाच मिळनार, मोठी बातमी

पि.एम किसान 18000 नमो शेतकरी 12000 एकदाच मिळनार, मोठी बातमी

 

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ आणि राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे, जसे की जमीन नोंदींची पडताळणी किंवा चुकीची माहिती, यापूर्वीचे हप्ते मिळाले नव्हते. मात्र आता सरकार अशा शेतकऱ्यांना हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे.

 

पि.एम किसान, नमो शेतकरी प्रलंबित हप्ते एकदाच मिळनार

 

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, १२व्या हप्त्यापासून ते १८व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित आहेत, त्यांना १९व्या हप्त्यासोबत हे पैसे दिले जातील. यासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक राज्याने पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकारी नेमले आहेत. या पडताळणीमुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल.

 

फक्त या शेतकऱ्यांना

 

ज्या शेतकऱ्यांना काही अडचणीमुळे पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळाला नव्हता. आता दोन्ही योजनांचे प्रलंबित पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, जे शेतकरी पात्र आढळतील त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जानार आहेत.

 

या प्रक्रियेसाठी सरकारने कोणतीही निश्चित वेळमर्यादा दिलेली नाही, पण काम सुरू आहे. ज्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पहिले, दुसरे आणि तिसरे हप्ते एकत्र मिळाले, त्याचप्रमाणे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनांचे प्रलंबित पैसे एकत्र जमा होऊ शकतात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

Leave a Comment