बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज सुरू, पहा कुठे आणि कसा करायचा अर्ज

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज सुरू, पहा कुठे आणि कसा करायचा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी देण्याची योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे 30,000 रुपये एकत्र मिळणार

 

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अर्ज कसा करायचा?

mahabocw.in या वेबसाइटला भेट द्या.

तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि याआधी तुम्हाला भांडी मिळाली नसतील, तर तुमची माहिती आपोआप दिसेल.

तुमच्या जवळचे किंवा सोयीचे शिबीर निवडा आणि भेट देण्यासाठीची तारीख निश्चित करा.

वेबसाइटवरून स्व-घोषणापत्र (Self-declaration form) डाउनलोड करा. ते भरून त्यावर सही करा.

सही केलेले स्व-घोषणापत्र पुन्हा वेबसाइटवर अपलोड करा आणि अर्ज सादर करा.

अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यावर त्याची प्रिंटआउट घ्या. या प्रिंटआउटमध्ये शिबिराची वेळ आणि तारीख असेल.

 

शिबिरात काय घेऊन जायचे?

ठरलेल्या दिवशी शिबिरात जाताना, तुमच्यासोबत अर्ज, नोंदणी कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जा. ही सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्हाला भांड्यांचा संच दिला जाईल.

ही प्रक्रिया खूप सोपी असून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता.

पि.एम किसान 18000 नमो शेतकरी 12000 एकदाच मिळनार, मोठी बातमी

Leave a Comment