तोडकर हवामान अंदाज ; येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार..

तोडकर हवामान अंदाज ; येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार..

तोडकर साहेबांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशमध्ये पाऊस परत येण्याची शक्यता आहे. २४ ऑगस्ट रोजी नाशिकच्या डोंगराळ भागात आणि बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात पावसाचा अंदाज आहे. तसेच, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि हिंगणघाटमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो अशी माहिती तोडकर यांनी दिली आहे.

तोडकर हवामान अंदाज ; २५ ऑगस्टचा अंदाज

२५ ऑगस्ट रोजी धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागांत, विशेषतः निफाड, येवला आणि देवळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच, सांगली आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

२६ आणि २७ ऑगस्टसाठी अंदाज

२६ ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागात पाऊस अपेक्षित आहे. २७ ऑगस्ट रोजी जळगाव आणि बुलढाण्यातही जोरदार पाऊस पडू शकतो. या वेळी जोरदार वाऱ्यामुळे काही पिके पडण्याची शक्यता तोडकर साहेबांनी वर्तवली आहे.
नाशिकमध्ये एक चक्रीय प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, धुळे आणि निफाडमध्ये रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो.

गनेशोत्सवात पाऊस कसा ?

 

तोडकर साहेबांनी पुढे सांगितले आहे की, गणेशोत्सवाच्या आसपास पावसाची तीव्रता वाढेल. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आधीच जास्त पाऊस झाला आहे, त्यांना अडचणी येऊ शकतात. हा पाऊस सुमारे चार दिवस टिकेल असा त्यांचा अंदाज आहे.

 

दक्षिण महाराष्ट्रासाठी, १ किंवा २ सप्टेंबरपर्यंत मोठा पाऊस अपेक्षित नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मूग आणि उडीद यांसारखी पिके काढण्यासाठी ही चांगली संधी आहे. एकूणच, सर्वत्र मोठा पाऊस होणार नाही, पाऊस विखुरलेला असेल, आणि काही ठिकाणी अजिबात पाऊस पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. २८ ऑगस्टनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असेही तोडकर म्हनाले.

Leave a Comment