E Pik Pahani सुरळीत चालू, लवकर करा हि आहे शेवटची तारीख

E Pik Pahani सुरळीत चालू, लवकर करा हि आहे शेवटची तारीख

 

ई पिक पाहणी अँप्लीकेशन मध्ये प्राँब्लम येत आसल्याने शेतकऱ्यांना ही पीक पाहणी करणे अवघड झाले होते. मात्र आता कालपासून ही पीक पाहणी ॲप सुरळीतपणे चालू झालेला आहे, आणि शेतकऱ्यांना सहजरीत्या ई पिक पाहणी करता येत आहे.

 

ही पीक पाणी ही शासकीय अनुदान, पिक-विमा तसेच नुकसान भरपाई इत्यादी शासकीय योजनांच्या अनुदानासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. आता हे ॲप सुरळीतपणे चालू झालेलं आहे तर या ॲप मध्ये ई पिक पाहणी कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.

 घरकुल योजना 2025 नवीन यादी जाहीर… लगेच पहा

 

E Pik Pahani कशा पद्धतीने करायची

 

ॲप डाऊनलोड करा ; सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरमधून ‘ई-पीक पाहणी'(DCS) हे ॲप डाऊनलोड करावे लागेल किंवा ते अपडेट करावे लागेल…

ॲप उघडल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकता.

तुमची माहिती भरा ; यामध्ये तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडून तुमचा खाते नंबर टाकायचा आहे…

पिकाची माहिती भरा ; आता तुम्हाला खरीप हंगाम निवडून तुमच्या शेतातील पीक कोणते आहे (उदा. ज्वारी, बाजरी, सोयाबीन) आणि त्याला पाणी कुठून मिळते (उदा. विहीर, पावसाचे पाणी) हे भरायचे आहे.

ॲपमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या पिकाचे दोन फोटो काढून ते अपलोड करावे लागतील…

सर्व माहिती भरल्यावर एकदा ती तपासून पाहा आणि सबमिट करा.

जर काही चूक झाली असेल, तर ती ४८ तासांच्या आत दुरुस्त करता येते.

E Pik Pahani ; हि आहे शेवटची तारीख

 

हे ॲप आता व्यवस्थित काम करत आहे आणि पीक पाहणीची प्रक्रिया १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायची आहे.१४ सप्टेंबर २०२५ हि शेवटची तारीख ठेवन्यात आलेली आहे, काही अडचण आल्यास तुम्ही तलाठी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

 घरकुल योजना 2025 नवीन यादी जाहीर… लगेच पहा

Gharkul Yojana New List ; घरकुल योजना 2025 नवीन यादी जाहीर…

Leave a Comment