मानीकराव खुळे हवामान अंदाज ; पाऊस पुन्हा सक्रिय होनार, कधीपासून & कोनत्या जिल्ह्यात

मानीकराव खुळे हवामान अंदाज ; पाऊस पुन्हा सक्रिय होनार, कधीपासून & कोनत्या जिल्ह्यात

 

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होनार आसल्याचा अंदाज निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. हा पाऊस कधीपासून आणि कोणत्या जिल्ह्यात होनार आहे पाहुयात सविस्तर..

 

पावसाची शक्यता कधी आणि कुठे?

 

२६ ऑगस्ट (मंगळवार) ते २९ ऑगस्ट (शुक्रवार) या चार दिवसांच्या कालावधीत, संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा थोडा सक्रिय होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस हळू पडणारा आणि ‘मघा’ नक्षत्रातला असेल.

 

विशेषता रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि संपूर्ण विदर्भ या जिल्ह्यांमध्ये तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो अशी माहिती मानीकराव खुळे यांनी दिली आहे.

 

या पावसामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस सातत्याने सुरू राहिल्यास, घाटमाथ्यावरील धरणांमधून नद्या आणि कालव्यांमध्ये आधीच सोडले जाणारे पाण्याचे प्रमाण तसेच राहू शकते. याचा अर्थ, काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढून पूरस्थिती कायम राहू शकते…

पावसासाठी अनुकूल वातावरन – तीन प्रमुख वातावरणीय बदलांमुळे

 

बंगालच्या उपसागरात ‘एम.जे.ओ.’ (Madden-Julian Oscillation) नावाच्या प्रणालीचा प्रवेश.

ईशान्य मध्य प्रदेशावर समुद्रासपाटीपासून ७.६ किमी उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे आणि ते वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता.

कमी दाबाचा पूर्व-पश्चिम मान्सूनचा पट्टा देशाच्या मध्यभागावरून दक्षिणेकडे सरकणे.

 

या कारनामुळे हा पाऊस राज्यात सक्रीय होनार आहे अशी माहिती मानिकराव खुळे यांनी दिली आहे. २६ ऑगस्ट (मंगळवार) ते २९ ऑगस्ट (शुक्रवार) या चार दिवसांच्या कालावधीत होईल.

Leave a Comment