नमो शेतकरी सन्मान निधी चा सातवा हप्ता, आज निर्णय होनार ?
नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. यावर काही गैरसमज पसरले होते की ही योजना बंद झाली आहे किंवा ती कृषी समृद्धी योजनेत विलीन झाली आहे, पण कृषी विभागाने हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील पात्र ९४ ते ९६ लाख शेतकऱ्यांच्या यादीची तपासणी सध्या सुरू आहे. केंद्र सरकारने राज्याला आवश्यक माहिती दिली असून, राज्य सरकारकडून यादीवर काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लवकरच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. – ज्ञानेश्वर खरात पाटील
नमो शेतकरी सन्मान निधी
२६ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार नमोच्या हप्त्याला मंजुरी देतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी दिली आहे. या निर्णयानंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.