कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यात पाऊस धरनार जोर – के.एस होसाळीकर

कमी दाबाचे क्षेत्र तयार, राज्यात पाऊस धरनार जोर – के.एस होसाळीकर

 

कमी दाबाचे क्षेत्र तयार : आज सकाळी ५.३० वा ओडिशा किनाऱ्यावर वायव्येकडील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील २ दिवसांत ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची आणि अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

या कमी दाबाच्या प्रभावामुळे पुढील 3,4 दिवसात राज्यातील कोकणात व घाट भागासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता आसल्याचा अंदाज हवामान खात्याचे अधिकारी के.एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

 

कमी दाबाचे क्षेत्र तयार आज या जिल्ह्यात पाऊस

 

विदर्भ ; यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय तर वर्धा,नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

 

मराठवाडा – नांदेड,लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट तळ उर्वरित मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

 

संपूर्ण कोकण आणि घाटमाथ्याव जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आलाय तर उत्तम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

Leave a Comment