तार कुंपण योजना : 90% अनुदान, असा करा आँनलाईन अर्ज

तार कुंपण योजना : 90% अनुदान, असा करा आँनलाईन अर्ज

वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीला तारेचे कुंपण घालू शकतात आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करू शकतात.

 

तार कुंपण योजना माहिती आणि अनुदान

या योजनेत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबांसाठी अनुदान मिळते.

1 ते 2 हेक्टर शेतीसाठी: 90% अनुदान

2 ते 3 हेक्टर शेतीसाठी: 60% अनुदान

3 ते 5 हेक्टर शेतीसाठी: 50% अनुदान

5 हेक्टरपेक्षा जास्त शेतीसाठी: 40% अनुदान

उरलेली रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल.

 

योजनेसाठीच्या महत्त्वाच्या अटी

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

शेतीचा कायदेशीर मालक किंवा भाडेपट्ट्याने घेतलेली शेती असावी.

शेतीवर कोणतेही अतिक्रमण नसावे.

शेती वन्य प्राण्यांच्या हद्दीत नसावी.

पिकांचे नुकसान झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

ग्राम विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

शेतकरी ओळख क्रमांक (महाडीबीटीसाठी)

जात प्रमाणपत्र

बँक पासबुक (बँक खात्याशी आधार लिंक केलेले)

ग्रामपंचायतीचा दाखला

समितीचा ठराव

जर शेतीत अनेक मालक असतील, तर इतर मालकांचे संमती पत्र

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही महाडीबीटी (https://mahadbt.maharashtra.gov.in) या सरकारी वेबसाइटवर अर्ज करू शकता.

 

Leave a Comment