Pikvima yojana 2025 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, क्लेम कसा करायचा…पहा सविस्तर

Pikvima yojana 2025 : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, क्लेम कसा करायचा…पहा सविस्तर

 

नवीन पिकविमा योजनेत आता शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी वैयक्तिक तक्रारी किंवा आगाऊ सूचना देता येनार नाहीत, अधिकाऱ्यांनी दिलेले अहवालच पीक उत्पन्नाचे आणि नंतर नुकसानभरपाईच्या दाव्याचे मुख्य आधार असतील… तर मग पिकविमा कशा पध्दतीने मिळनार आहे आणि कोनत्या शेतकऱ्यांना मिळनार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात पाहुयात…..

 

Pikvima yojana 2025 ; क्लेम कसा करायचा…

 

सुधारित पिकविमा योजनेत आता पीक नुकसानीची भरपाई फक्त ‘पीक कापणी प्रयोग’ (Crop Cutting Experiment) या एकाच निकषावर आधारित आसनार आहे. हा प्रयोग केंद्र सरकारद्वारे केला जानार आसून या प्रक्रियेमध्ये, एका विशिष्ट पिकाच्या मंडळातील (crop circle) सध्याच्या वर्षाच्या सरासरी उत्पन्नाची मागील ५ ते ७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नाशी तुलना केली जाते. जर उत्पन्नात घट झाली असेल, तर त्या घटलेल्या उत्पन्नानुसार सर्व विमाधारक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईचा दावा तयार केला जातो.

 

उदाहरण: जिथे सोयाबीनचे सरासरी उत्पन्न पूर्वी ७ क्विंटल होते आणि आता ते ५ क्विंटल झाले आहे. या २ क्विंटलच्या फरकासाठी सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. नुकसानभरपाईची रक्कम ठरवण्यासाठी पीक कापणी प्रयोग आणि ‘ईस्टार’ (Estar) सारख्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला जानार आहे.

 

शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची नोंदणी करण्यास सांगावे आणि पंचनामे योग्यरित्या सादर केले आहेत की नाही हे सुनिश्चित करावे. या अधिकाऱ्यांनी दिलेले अहवालच पीक उत्पन्नाचे आणि नंतर नुकसानभरपाईच्या दाव्याचे मुख्य आधार असतील.

 

Leave a Comment