Aadhar bank seeding : बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा मोबाईलवरून..
बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे (आधार सीडिंग) आता खूप सोपे झाले आहे. सध्या, ही प्रक्रिया घरबसल्या एनपीसीआय (NPCI) पोर्टलद्वारे करता येते. या लेखात या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज लागनार नाही. एनपीसीआय पोर्टलवर लवकरच १६० पेक्षा जास्त बँका उपलब्ध होणार आहेत…
Aadhar bank seeding = एनपीसीआय पोर्टलचा वापर करून आधार लिंक करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
◆ दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा थेट गुगलवर ‘एनपीसीआय’ सर्च करून पोर्टलवर जाऊ शकता.
◆पोर्टलच्या मेनूमध्ये ‘कंजूमर’ या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर ‘भारत आधार सीडिंग’ हा पर्याय निवडा.
◆ तुमचा आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे तपासण्यासाठी ‘चेक स्टेटस’ या पर्यायाचा वापर करू शकता.
◆ जर तुम्हाला नवीन बँकेला आधार लिंक करायचा असेल, तर ‘रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग’ हा पर्याय निवडा. त्यानंतर, तुमचा आधार नंबर टाकून ‘सीडिंग’ आणि मग ‘फ्रेश सीडिंग’ निवडा.
◆तुमच्या बँकेचे नाव निवडा, तुमचा खाते क्रमांक टाका आणि अटी व शर्ती मान्य करून ‘प्रोसीड’ वर क्लिक करा.
◆ तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. तो ओटीपी टाकून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.
या प्रक्रियेद्वारे, तुम्ही स्वतः तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक किंवा डि-लिंक करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, ‘चेक स्टेटस’ पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता. या पद्धतीने, तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवाय,त्रासाशिवाय घरबसल्या आधार सीडिंगचे काम करू शकता.। हि माहिती आवडल्यास ईतरांनाही शेयर करा🙏