Cabinet meeting ; आजच्या मंत्रीमंडळ निर्णयात शेतकऱ्यांसाठी काय ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२६.आँगष्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. तर कोनत्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आणि शेतकऱ्यांनसाठी काय निर्णय घेतले गेले सविस्तर पाहूयात…
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या बैठकीत कोणताही दिलासा मिळालेला नाही तसेच नमो शेतकरी च्या हप्त्याचाही कोनताही निर्णय घेतला गेलेला नाही…
Cabinet meeting ; मग मंजूर झालेले निर्णय कोनते ?
1) बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे रूपांतर पूर्ण क्षमतेच्या बंधाऱ्यांमध्ये करण्यास मान्यता.
2) राज्यात कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून ‘महाराष्ट्र कामगार संहिता नियम’ तयार करण्यास मंजुरी.
3) राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मान्यता.
4) संघर्ष योद्धा बाबनराव धकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला सरकारी हमीवर मुदत कर्ज देण्यास मंजुरी.
5) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीची विक्री करण्यास मान्यता.
6) नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्ग प्रकल्पाची आखणी आणि जमीन संपादनासाठी प्रकल्प महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी.
7) बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी व कर्मचारी पदे निर्माण करण्यास मान्यता.
8) १९५० च्या महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यामध्ये सुधारणांना मंजुरी.
9) विमुक्त आणि भटक्या जमातींतील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध लाभ प्रभावीपणे देण्यासाठी नवीन कार्यपद्धतीला मान्यता.
10) नागपूर आणि अमरावती विभागांमधील नझूल जमिनींसाठी असलेल्या विशेष योजनेला एक वर्षाची मुदतवाढ.
शेतकऱ्यांनसाठी फक्त प्रतीक्षाच
या बैठकीत नऊ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे पावसामुळे नुकसान होऊनही, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच अनेक दिवसापासून शेतकरी नमो शेतकरी च्या हप्त्याची वाट पाहत आहेत याबाबत हि कोनताच निर्णय घेतला गेला नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून, त्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षा कायम आहे.