Cotton price ; 11% आयातशुल्क काढल्याने आयात वाढनार, कापसाचे भाव घसरनार

Cotton price ; 11% आयातशुल्क काढल्याने आयात वाढनार, कापसाचे भाव घसरनार

 

अमेरिकेच्या ५० टक्के आयात शुल्काचा पहिला झटका कापूस उत्पादकांना बसला आहे. कापड निर्यात सुरु राहण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३० सप्टेंबरपर्यंत काढले आहे. यामुळे कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोचणार आहे. परिणामी देशात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा निर्माण होईल. याचा थेट दबाव कापसाच्या भावावर येईल आणि नव्या हंगामात शेतकरीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 

अमेरिका कापड निर्यातीसाठी महत्वाचे मार्केट आहे. भारतात उत्पादीत होणाऱ्या एकूण कापडापैकी २२ टक्के निर्यात होते. तर निर्यात होणाऱ्या एकूण कापडापैकी जवळपास ३५ टक्के कापडाची निर्यात एकट्या अमेरिकेला होत असते. अमेरिकेला तयार कपडे यात टी शर्ट, महिला आणि मुलींचे ड्रेस, लहान मुलांचे कपड्यांचा समावेश आहे. तसेच घरगुती वापरासाठीचे कापड आणि कारपेट यांची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते.

 

अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर ७ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क लागू केले. तर आणखी २५ टक्के आयात शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. म्हणजेच २७ ऑगस्टनंतर भारताच्या कापडावर अमेरिकेत एकूण ५० टक्के आयात शुल्क लागू होईल. अमेरिकेच्या बाजारात भारताला प्रामुख्याने चीनसोबत स्पर्धा करावी लागते. बांगलादेश आणि व्हिएतनाम तसेच पाकिस्तानही अमेरिकेला कापड आणि इतर कापडाच्या वस्तु निर्यात करतात. पण यात केवळ चीनवर ३० टक्के आयात शुल्क आहे. तर व्हिएतनाम आणि बांगलादेशवर २० टक्के तसेच पाकिस्तानच्या कापडावर १९ टक्के शुल्क लावले जाणार आहे. म्हणजेच सर्वाधिक शुल्क भारतावर असणार आहे. त्यामुळे निर्यात कमी होण्याची भीती आहे.

 

कापडाची निर्यात सुरळीत सुरु राहण्यासाठी कापड उद्योगाने केंद्राकडे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सोमवारी अधिसूचना काढून मंगळवारपासून (ता. १९) आयात शुल्क काढण्याला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत कापड आणि सूत उद्योगाने केले आहे. कारण उद्योगांना आता आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार कापूस मिळणार आहे. तसेच कापड निर्यातीसाठी या निर्णयामुळे मदत होईल, असेही उद्योगांचे म्हणणे आहे.

Cotton price ; कापसाची आयात वाढनार..

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने ११ टक्के आयात शुल्क असतानाही कापूस आयात विक्रमी पातळीवर पोचणार होती. जुलैच्या शेवटपर्यंत देशात तब्बल ३३ लाख गाठी कापूस आयात झाला. आणखी ६ लाख गाठी आयात होण्याची शक्यता होती. मात्र, आता आयात शुल्क काढल्याने कापसाची आयात वाढण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे देशातील शिल्लक कापूस साठ्याचे प्रमाणही वाढणार आहे. सीएआयने नुकत्याच वर्तविलेल्या अंदाजानुसार ५७ लाख गाठी कापूस शिल्लक राहण्याची शक्यता होती. पण आयात शुल्क काढल्यानंतर आयात वाढणार आणि शिल्लक साठाही वाढण्याची शक्यता आहे.

 

शेतकरी आडचणीत येणार

 

वाढत्या कापूस आयातीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे देशातील कापूस उत्पादक आधीच अडचणीत होते. गेले वर्षभर कापसाचा भाव आयात शुल्क असतानाही ७ हजारांच्या आसपास राहीला. आता आयात शुल्क काढल्याने आयात वाढून देशातील बाजारावरही याचा परिणाम होणार आहे.

 

नव्या हंगामातील कापूस बाजारात येईल तेव्हा देशात आयात झालेला शिल्लक कापूस मोठ्या प्रमाणात असेल. तो कमी भावात आयात झालेला असेल, त्यामुळे नव्या हंगामातही कापसाच्या भावार आयात कापसाचा दबाव निर्माण होणार आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.

Leave a Comment