Havaman andaj ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधार, हवामान खात्याने दिला सतर्कतेचा ईशारा
पुढील काही तासात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्, तसेच घाटमाथा आणि कोकण या संपूर्ण भागामध्ये कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस होणार आहे, कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हवामान खात्याने दिलेला सविस्तर असा अंदाज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत…
Havaman andaj ; पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधार
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (येल्लो अलर्ट) हवामान खात्याने जारी केला आहे. तसेच वर्धा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये तिजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये ही जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
MahaDBT Lottery List ; नवीन लाभार्थी यादी आली, तुमचे नाव चेक करा..यादी डाऊनलोड करा