Havaman andaj 5 days ; राज्यात ईतके दिवस मोठा पाऊस नाही…imd चा अंदाज

Havaman andaj 5 days ; राज्यात ईतके दिवस मोठा पाऊस नाही…imd चा अंदाज

 

गेल्या आठवड्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर, मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. आता आज आणि पुढील 5 दिवस पाऊस कसा राहील याबाबत अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज आपण या लेखात सविस्तर पाहू..

 

Havaman andaj 5 days

 

आज मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विधानसह हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. तसेच बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातही हलक्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

पुण्याच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला असून पुण्याच्या पूर्व भागात तसेच अहिल्यानगर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळलेलं वातावरण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.

उद्या 25 आँगष्टला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.कोकणातील काही जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Comment