HSRP नंबर प्लेट नसेल तर किती दंड भरावा लागेल? Hsrp खर्च किती ?
जर तुमच्या गाडीवर HSRP (High-Security Registration Plate) नंबर प्लेट नसेल, तर तुम्हाला ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. हा नवीन नियम १ डिसेंबर २०२५ पासून लागू होईल.
HSRP नंबर प्लेट किती खर्च येतो?
HSRP प्लेटचा खर्च तुम्ही कोणत्या राज्यात आहात आणि तुमचं वाहन कोणतं आहे, यावर अवलंबून असतो.
दुचाकी वाहनांसाठी : ₹३०० ते ₹५०० पर्यंत.
चारचाकी वाहनांसाठी : ₹५०० ते ₹१,१०० पर्यंत.
HSRP प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ
सरकारने आता HSRP प्लेट बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. ही मुदतवाढ सर्व जुन्या आणि नवीन वाहनांसाठी आहे. त्यामुळे, तुमच्या गाडीवर १ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP प्लेट बसवणं गरजेचं आहे.
सरकारने मुदतवाढ का दिली?
अनेक वाहनधारकांनी अजूनही HSRP प्लेट बसवलेली नाही. काही ठिकाणी अपॉइंटमेंट मिळवण्यास अडचणी येत आहेत, तर ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर्स कमी आहेत. लोकांची सोय व्हावी म्हणून सरकारने ही मुदतवाढ दिली आहे.
३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी तुमच्या गाडीवर HSRP नंबर प्लेट बसवून घ्या.
HSRP साठी अधिकृत सेंटर्सवर किंवा ऑनलाइन पोर्टल्सवर अपॉइंटमेंट बुक करा.
आवश्यक कागदपत्रे आणि फी भरून वेळेत HSRP प्लेट मिळवा.
१ डिसेंबर २०२५ पासून, HSRP नसणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे, हा महत्त्वाचा नियम पाळून स्वतःला दंडापासून वाचवा.