HSRP Number plate ; बसवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
HSRP Number plate : वाहनांची सुरक्षा आणि ओळख
प्रमाणित करण्यासाठी अनिवार्य असलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता वाहनधारकांना ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत ही नंबर प्लेट बसवता येईल.
HSRP Number plate ; शेवटची संधी १ डिसेंबरपासून कारवाईला सुरुवात
ही मुदतवाढ जरी वाहनधारकांसाठी दिलासादायक असली, तरी ही शेवटची संधी असल्याचा स्पष्ट इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दिला आहे. यापूर्वी तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ही चौथी आणि अंतिम मुदतवाढ आहे. १ डिसेंबर, २०२५ पासून HSRP नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे RTO कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
राज्यात अनेक वाहनधारकांनी अद्याप या नियमाची पूर्तता केलेली नाही, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच सुमारे ७ लाखाहून अधिक वाहनांनी HSRP साठी नोंदणी केलेली नाही.
या उदासीनतेला आणि तांत्रिक अडचणींना लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता वाहनधारकांनी या संधीचा फायदा घेऊन ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या वाहनांना HSRP बसवून घेणे आवश्यक आहे.