HSRP number plate नसलेल्या वाहनांवर दंड किती?
जर तुमच्या वाहनावर HSRP प्लेट नसेल, तर तुम्हाला ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. १ डिसेंबर २०२५ पासून दंडाची ही रक्कम लागू होणार आहे.
HSRP number plate प्लेटसाठी किती खर्च येतो?
HSRP प्लेटचा खर्च राज्यानुसार आणि वाहनाच्या प्रकारानुसार बदलतो.साधारणपणे दुचाकी वाहनांसाठी ₹३०० ते ₹५०० तर चारचाकी वाहनांसाठी: ₹५०० ते ₹१,१०० रूपये लागु शकतात.
HSRP बसवण्यासाठी मुदतवाढ
सरकारने HSRP बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ सर्व जुन्या आणि नवीन वाहनांसाठी आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना १ डिसेंबर २०२५ पूर्वी आपल्या वाहनावर HSRP प्लेट बसवणे अनिवार्य आहे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल…
अनेक वाहनधारकांनी अजूनही HSRP प्लेट बसवलेली नाही.शहरी भागात HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळवणे कठीण होत आहे. ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर्सची संख्या कमी आहे, ज्यामुळे लोकांना अडचणी येत आहेत.या सर्व कारणांमुळे, लोकांची सोय व्हावी यासाठी सरकारने ही मुदतवाढीची संधी दिली आहे.
३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी आपल्या वाहनावर HSRP प्लेट बसवून घ्या…अधिकृत HSRP सेंटर्स किंवा ऑनलाइन पोर्टल्सवरून अपॉइंटमेंट बुक करा…आवश्यक कागदपत्रे आणि फी भरून वेळेत HSRP प्लेट मिळवा.
१ डिसेंबर २०२५ पासून, ज्या वाहनांवर HSRP प्लेट नसेल, त्यांच्यावर वाहतूक पोलीस कठोर कारवाई करतील, ज्यात दंड आणि इतर कायदेशीर कारवाईचा समावेश असेल. त्यामुळे, सर्व वाहनधारकांनी या संधीचा फायदा घेऊन लवकरात लवकर HSRP प्लेट बसवून घेणे महत्त्वाचे आहे.