Imd rain alart ; आज या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपनार…
राज्यात पुढील तीन ते चार तासात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय. विदर्भ, कोकण, आणि घाटमाथ्यावरील काही जिल्ह्यात मुसळधार ते आतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहुयात सविस्तर जिल्हानिहाय हवामान अंदाज.
विदर्भ ; चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे.
मराठवाडा ; नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून धाराशिव जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य/उत्तर महाराष्ट्र ; नाशीक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये ही मुसळधार ती मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट आहे. नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
कोकण : मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Imd rain alart – 2० आँगष्ट हवामान अंदाज
उद्या 20 ऑगस्ट पासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार असून विदर्भात हलक्या ते मध्यम तर घाटमाथा आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
21 आँगष्टपापुन पाऊस ओसरनार – Imd
21 ऑगस्ट पासून संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरणार असून फक्त कोकण आणि घाटमाथ्यावरच पावसाचा अंदाज आहे. Imd