kapus favarni ; आला पोळा कपाशी सांभाळा, कोनते औषध वापरावे, का आणि कशामुळे…

kapus favarni ; आला पोळा कपाशी सांभाळा, कोनते औषध वापरावे, का आणि कशामुळे…

 

आला पोळा कपाशी सांभाळा… हे वाडवडील सांगून गेले. पोळा अमावस्या आणि कापूस फवारणी याचा काय संबंध आहे हे अनेकांना माहिती नाही, तसेच या फवारणीत कोणती औषधे वापरली पाहिजे हेही माहिती नाही. या लेखात पोळा आमावशा काळात फवारणी नियोजन कसे करावे, ते आपण जाणून घेऊ….

 

कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे, हे भलेही माहिती नसेल पण तरीही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील शास्त्र….

 

या अमावस्या काळातच कापुस पिक पातेधारणा, फुलधारणा, फळधारणा आवस्थेत आसते. या काळात गुलाबी बोंडआळी, तसेच ईतर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव कापसावर होतो…या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच पातेगळ थांबने, आणि जास्तीत जास्त फुलधारना होन्यासाठी हि फवारणी खुपच फायदेशीर ठरते…

 

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोळा अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. त्याचा परिणाम 5-6 दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे न उमललेली कळी दिसू लागते…त्यामुळे पोळ्याच्या आमावशेला फवारणी करायलाच पाहिजे..

 

आमावशेच्या दोन दिवस आधी आणि आमावश्या काळात बोंडआळी तसेच ईतर किडींचे पतंग अंडी घालतात त्यामुळे पोळा आमावशेची फवारणी पोळ्याच्या दोन दिवस आधीच करायला पाहिजे…जर पोळ्यानंतर फवारणी करायची झाल्यास कोनते औषध घ्यावे आणि पोळ्याआधी फवारणी करत असाल तर कोनते औषध घ्यावे पाहूया…

 

kapus favarni ; आला पोळा कपाशी सांभाळा

 

पोळ्याच्या आगोदर फवारणी करताना, लिंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ची फवारणी केल्यास कपाशीचे झाड कडू होते आणि तीथे पतंग अंडी घालत नाहीत आणि आपले कपाशीचे पिक किडींपासून सुरक्षित राहते..वरील औषधासोबत पोलीस किंवा प्रोफेक्स सुपर यापैकी एक किटकनाशक आणि एखादे टाँनीक घेऊन फवारणी करावी…

 

जर पोळ्याच्या आधी फवारणी करने शक्य झाले नाही आणि पोळ्यानंतर फवारणी करत असाल तर प्रोफक्स सुपर हे वापरावे यामुळे आळ्या,रसशोषक किडी नियंत्रण होते तसेच हे अंडीनाशक म्हनुनही काम करते..यासोबतच बुरशीनाशक,टाँनीकचाही वापर करू शकता…

Leave a Comment