Karjmafi 2025 ; शेतकरी कर्जमाफी कधी होनार, समीतीचा निर्णय कधी..
महायुती सरकारचं निवडणुकीपूर्वीचं मोठं आश्वासन शेतकरी कर्जमाफीचं… पण आता सत्तेत आल्यानंतर यावर त्यांनी मोठा यू-टर्न घेतलाय. आधी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण आता मात्र सरकारने थेट हात वर केलेत…
Karjmafi 2025 ; नंतरच कर्जमाफीचा निर्णय
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की शेतकरी कर्जमाफीसाठी एक अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतरच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल.
आता यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की सगळ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, ही सरसकट कर्जमाफी नसेल. ज्यांनी मोठमोठे फार्महाऊस आणि बंगले बांधलेत त्यांना कर्जमाफी कशासाठी असेही बावनकुळे म्हनाले..
चंद्रशेखर बावनकुळे म्हनाले की, सरकारचा उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांना ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे. जे शेतकरी अडचणीत आहेत आणि आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात त्यांचीच सरकार कर्जमाफी करेल.
यावरुन असं दिसतंय की, ही कर्जमाफी लगेचघ होणार नाही. सरकारला जेव्हा निवडणुकीत याचा फायदा होईल म्हणजे निवडणूका जवळ येतील त्याच वेळी ही कर्जमाफी होईल आणि ती अनेक अटींसह असेल. सरसकट कर्जमाफी होनार नाही..