New Ration card ; नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

New Ration card ; नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 

New Ration card नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हा अर्ज सादर करू शकता.तर हा अर्ज कसा आणि कुठे करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूयात…

New Ration card ; ऑनलाइन अर्ज कसा करावा?

 

◆ सर्वप्रथम तुम्हाला RCMSMahaFood या अधिकृत सरकारी वेबसाइटवर जावे लागेल….

◆ सर्वात आधी तुम्हाला या वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी (New User Registration) या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा (User ID) आणि पासवर्ड तयार करावा लागेल….

◆ नोंदणी झाल्यानंतर, तुम्ही तयार केलेल्या आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा. त्यानंतर, (New Application) हा पर्याय निवडून अर्ज भरायला सुरुवात करा….

 

◆ यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडा…. त्यानंतर, मुख्य अर्जदाराचे नाव, जन्मतारीख आणि व्यवसाय यांसारखी महत्त्वाची माहिती भरा….

◆ कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरा….

◆ तुमचा सध्याचा पत्ता आणि गॅस कनेक्शनबद्दलची माहिती भरा….

 

◆ अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यात ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे PDF किंवा JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा…..

◆ सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, तुमचा अर्ज एकदा सविस्तर तपासा. काही चूक आढळल्यास, ती दुरुस्त करा. अर्जाची तपासणी झाल्यावर, तुम्ही तो अंतिम सबमिशनसाठी पाठवू शकता….

अशा पद्धतीने तुम्ही नवीन शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अधिकृत माहितीसाठी, तुम्ही RCMSMahaFood च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Leave a Comment