Onion Rate ; कांदा होनार बंग्लादेशात निर्यात, कांदा उत्पादकांना दिलासा…
गेल्या साडेतीन महिन्यांपासून भारताने कांदा निर्यात थांबवली होती, पण आता बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
काहीसा म्हनन्याच कारण म्हनजे सध्या पहिल्या टप्प्यात फक्त २०० मेट्रिक टन कांदा आयात करण्याची परवानगी बांगलादेशने दिली आहे. मात्र, भारतीय कांद्याची निर्यात क्षमता बघता ही निर्यात वाढवण्याची गरज आहे, असं कांदा निर्यातदार आणि शेतकरी संघटनांनी सांगितलं आहे.
Onion Rate ; बांगलादेशातून कांदा आयातबंदी हटवली
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत होते. आता बांगलादेश सरकारने १३ डिसेंबर २०२५ पर्यंत ही आयातबंदी हटवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने बांगलादेशला तब्बल ४.८० लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला होता. यातून भारताला १७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी ४०% कांदा बांगलादेश खरेदी करतो.
सध्या जरी २०० टन कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी, येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, जाणकारांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या दरात [Onion Rate] मोठी सुधारणा होणे कठीण आहे.