Panjab dakh ; फक्त एवढेच दिवस उघाड, या तारखेपासून पुन्हा पावसाचं कमबँक

Panjab dakh ; फक्त एवढेच दिवस उघाड, या तारखेपासून पुन्हा पावसाचं कमबँक

 

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबद्दल महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या राज्यात पावसाने उघडीप दिली असून, २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहील. या काळात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण मोठ्या पावसाची शक्यता नाही.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे 30,000 रुपये एकत्र मिळणार – लगेच पहा

 

या उघडीपीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे, जसे की फवारणी, पूर्ण करावीत, असा सल्ला डख यांनी दिला आहे. हा काळ शेतीच्या कामांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

Panjab dakh ; पुन्हा पावसाला सुरुवात कधी?

 

२६ ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेषतः २७, २८ आणि २९ ऑगस्ट या दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडेल. या काळात विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे 30,000 रुपये एकत्र मिळणार – लगेच पहा

 

पंजाब डख यांच्या मते, सप्टेंबर महिन्यातही पावसाचे सत्र सुरूच राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडीपेनुसार नियोजन करून शेतीची कामे करावीत, जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाही.

 

Panjab dakh ; जायकवाडी धरणाची स्थिती

 

पंजाब डख यांनी जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दलही माहिती दिली आहे. नाशिक आणि गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरण ९७% भरले आहे. गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे, नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. आपल्या जनावरे आणि शेतीतील वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन डख यांनी केले आहे. पुरासारख्या स्थितीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करावीत, असेही त्यांनी सांगितले.

 

पंजाब डख यांच्या या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाची उघडीप असून त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. या माहितीचा वापर करून शेतकरी योग्य नियोजन करू शकतात.

पि.एम किसान 18000 नमो शेतकरी 12000 एकदाच मिळनार, मोठी बातमी

Leave a Comment