Panjab dakh andaj today ; पाऊस घेनार विश्रांती, चार दिवसानंतर पुन्हा जोरदार
आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम ते रिमझिम पाऊस होनार आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
ऊद्यापासुन 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर काहीसा कमी होईल. मात्र, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, आणि भंडारा या भागात पाऊस सुरूच राहील असेही पंजाब डख यांनी सांगितले.
4 ते 7 सप्टेंबर या कालावधीत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस परत येईल. विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत पुन्हा सविस्तर माहिती दिली जाईल..(पंजाब डख)
31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पाऊस कमी असल्याने, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. कारण पुन्हा 4 सप्टेंबर पासून राज्यात पाऊस जोर धरनार आहे.
सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूरसारख्या अवर्षणग्रस्त भागांमध्ये तसेच बीड जिल्ह्यात ओढे, नाले आणि तळी भरून निघण्याची शक्यता आहे. यामुळे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल असे डख साहेबांनी सांगितले…