panjab dakh हवामान अंदाज ; राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होनार, पहा कधीपासून
पंजाब डक यांच्या अंदाजानुसार, २४ ते २७ ऑगस्ट या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी, जसं की फवारणी आणि खत घालण्यासाठी चांगला वेळ मिळेल. या काळात कोणत्याही मोठ्या पावसाची शक्यता नाही, काही ठिकाणीच हलका पाऊस पडेल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
रामचंद्र साबळे अंदाज ; पाऊस घेनार मोठी विश्रांती, या तारखेपर्यंत
panjab dakh म्हनतात या तारखेपासून पावसाला सुरुवात
२७ ऑगस्टपासून विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होईल. त्यानंतर हा पाऊस मराठवाड्यातील काही भागांमध्येही येईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
२८, २९, आणि ३० ऑगस्ट या काळात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडेल. यात परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस राहील असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
या तारखेनंतर पाऊस कमी होनार…
त्यानंतर १ सप्टेंबरनंतर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जास्त पाऊस पडेल, त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती पंजाबरावांनी दिलीय…
परतीच्या पावसाचा अंदाज – पंजाब डख
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच १० ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
रामचंद्र साबळे अंदाज ; पाऊस घेनार मोठी विश्रांती, या तारखेपर्यंत
रामचंद्र साबळे अंदाज ; पाऊस घेनार मोठी विश्रांती, या तारखेपर्यंत